प्रशासनाचा बेजबाबदारपणा, शासनाची अनास्था का लोकांचा आडमुठेपणा : चूक कोणाची - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Friday, August 9, 2019

प्रशासनाचा बेजबाबदारपणा, शासनाची अनास्था का लोकांचा आडमुठेपणा : चूक कोणाची


प्रशासनाचा बेजबाबदारपणा, शासनाची अनास्था का लोकांचा आडमुठेपणा : चूक कोणाची

प्रमोद मांडवे/ कडेगांव 

                          २०१२ या हॉलीवूड मधील चित्रपटाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात सुनामी सारखा महापूर आलाय. सतत दुष्काळी सांगली जिल्ह्यात तर पावसाने हाहाकार माजवलाय. एरव्ही पाउस पाउस जप करत बसणारे आता जा रे जा रे पावसा हे गीत गात आहेत एवढा महाभयंकर हा पाउस झालाय. भिलवडी आणि पलूस तालुक्यात तर कृष्णामाई घराघरात घुसून हि जागा माझी आहे असा जणू हक्कच सांगू लागली आहे. या महापुरामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले. घरदार सोडून विस्थापित लोकांना सर्वसामान्य लोकांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला खरा. पण पुन्हा नवनिर्मितीची वाट अतिशय खडतर आहे. पण प्रश्न हा आहे कि हि चूक कोणाची ? 
                      (सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा)Help For Sangli Flood Victims via @ImpactGuru            २००५ साली देखील असाच महापूर या परिसराने नागरिकांनी अनुभवला आहे. १४ वर्षांनी पुन्हा तशीच परिस्थिती आली आणि आणखी मोठी झाली. २००५ सालच्या महापुरानंतर शासनाने अनेक आश्वासने दिली. आता पुन्हा अशी परिस्थिती येणार नाही. आलीच तर प्रशासन सज्ज आहे. आपत्कालीन व्यवस्था सज्ज केली आहे वगैरे, वगैरे अश्या बाता मारल्या गेल्या. पण बदल मात्र दिसला नाही. याउलट पाउस कमी होता. त्यावेळी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही आणि कृष्णेकडे कानाडोळा केला. मग काय आला कृष्णेला राग. जसाजसा पाउस वाढला, कोयनेतील विसर्ग वाढला तसा कृष्णाकाठ दुथडी भरून वाहू लागला आणि चिंता वाढली. लोकांच्यात हाहाकार माजल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले. झाले गेले विसरून लोकांना मदत करण्याचे ठरले खरे. पण मदतीसाठी लागणारे साहित्य व बोटी आहेत कोठे? हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या बोटीने २५००० लोकांना वाचविणे म्हणजे चहाच्या कपाने नदीतील पाणीउपसा केल्यासारखे आहे. प्रशासन मात्र याला बचावकार्य संबोधून मोकळे झाले. सगळ्या गोष्टी अलगत घेतल्या गेल्या. २००५ च्या महापुरानंतर चौकशी समितीने अहवाल करून शासनाकडे काही सूचना सोपविल्या. परंतु उपाययोजना राहिल्या अहवालसुद्धा आजतागायत बघायला मिळाला नाही. प्रतिबंध हा उपायांपेक्षा केंव्हाही चांगला असे म्हणतात. २००५ च्या महापुरानंतर कोणतीही प्रतिबंधक उपाययोजना केली नसल्यामुळेच हि परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाचा आणि मंत्र्यांचा तर रुबाबच वेगळा. उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन बचावकार्य हातात घेण्याचे सोडून फोटो सेशन मध्ये गुंग नेतेमंडळीना काय बोलावे? काही पक्ष आणि नेतेमंडळी तर निर्लज्जासारखे यात्रा काढण्यात व्यस्त होते. पश्चिम महाराष्ट्र पाण्याखाली जातोय आणि हे मिरवत बसतायत. यापेक्षा मोठी चेष्टा सर्वसामान्य लोकांची कोणी केली नसेल. 
                   (सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा)Help For Sangli Flood Victims via @ImpactGuru     वास्तविक सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावर येणारा महापूर हा मानवनिर्मितच आहे. कर्नाटकातील आलमट्टी धरणातील पाण्याच्या फुगीमुळे या भागात पाणी गावागावात घुसते. यावर वेळीच कर्नाटक सरकार बरोबर चर्चा केली असती तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. पण मग नेत्यांना समाजसेवा आणि जलपर्यटनाची संधी मिळाली नसती. त्यामुळे कदाचित हि उदासीनता असावी. असो एवढ सगळ होऊन यामध्ये आपल सर्वस्व गमाविलेल्या लोकांना दोषी ठरवले जाते. त्यावेळी या व्यवस्थेचा राग नाहीतर तिरस्कार होतो. काही अर्धशहाणे आणि प्रशासकीय धेंड म्हणतात, लोकांना स्थलांतरीत होण्याच्या सूचना दिल्या होत्या. ह्या मंद्बुद्धीना माहिती नाही कि, वर्षानुवर्षे हे लोक आपला संसार उभा करतात. काही क्षणात त्यावर पाणी सोडायचे हे किती असहनीय आहे. हे फक्त संसार असणाऱ्या विस्थापितालाचं माहिती. रानावनात कष्ट करून उभारलेला संसार, घरदार, पाठीवर हात फिरवून मरमर राबून मुक्या जनावराला जागविणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या डोळ्यादेखत मुक्या सोबत्याला पाण्यात तडफडताना कसे पहावेल. लोकांना वाचविण्यासाठी लोक आहेत पण ह्या मुक्या जनावरांना कोण वाचवणार म्हणून त्यांची व्यवस्था करणाऱ्या या शेतकऱ्याला आडमुठे म्हणा नाहीतर आणखी काही म्हणा पण भावना फक्त याच्याच जिवंत आहेत. बाकीचे सगळे दिखावे करतायत.
                            
पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
पूरग्रस्तांना मदत करा. या लिंकवर क्लिक करा.
असो चूक कोणाची हे येणारा काळच सांगेल. पण प्रशासन आणि शासन या दोन्ही जुलमी व्यवस्थाची वाट न बघता आपल्यापरीने मदत करणारे सर्वसामान्य हेच खरे नायक आहेत. कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न करता आपल्या लोकांना आसरा देत आहेत. एकमेकांना ओळखत नसताना सुद्धा हि माणुसकी बघायला मिळते ती फक्त पश्चिम महाराष्ट्रातच आणि प्रामुख्याने सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात. कारण यांच्यावर संस्कार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे. या संकटाला तोंड देण्याची ताकद ईश्वर देऊ आणि हा बंधुभाव छत्रपती संस्कार सतत नांदो हीच सदिच्छा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785