गोपीचंद पडळकर तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है | कडेगांव येथे आ. गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक. - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Friday, June 26, 2020

गोपीचंद पडळकर तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है | कडेगांव येथे आ. गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ कडेगांव तालुक्यातील गोपीचंद पडळकर समर्थक कार्यकर्त्यानी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस कडेगांव येथील मुख्य चौकात दुग्धाभिषेक घातला. यावेळी गोपीचंद पडळकर तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है | अश्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. गोपीचंद पडळकर समर्थकांनी I Support Gopichand Padalkar या नावाचे बॅनर हातात घेऊन गोपीचंद पडळकर यांचे समर्थन केले.

           
kadegaon
गोपीचंद पडळकर समर्थकांनी कडेगांव
येथे निवेदन दिले. 
यावेळी तहसील कार्यालय कडेगांव येथे धनगर समाजाविषयी जातिवाचक पोस्ट टाकून भावना दुखवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे असे निवेदन सखल धनगर समाज कडेगांव तालुका व बहुजन समाजाच्या वतीने देनेत आले. धनगर समाजाचे नेते प्रकाश गढळे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही धनगर समाजाच्या विरोधातिल असून धनगर समाजाला आरक्षण मिळू नये. धनगर समाज मुख्य प्रवाहात येऊ नये. अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे धनगर समाजात असणारे नेतृत्व संपवण्यासाठी आ. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलने केली जात आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. कडेगांव पंचायत समितीचे सदस्य रवींद्र ठोंबरे म्हणाले, आ. गोपीचंद पडळकर आमदार झालेने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्याना व कार्यकर्ते यांना खूप दुख झाले आहे. परंतु बहुजन समाज गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकीमुळे सुखावला आहे. गोपीचंद पडळकर यांची लोकप्रियता बघवत नसल्याने गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो. 
https://imojo.in/ngoreports
संस्थांचे कार्य अहवाल  
kadegaon
कडेगांव येथे गोपीचंद पडळकर यांच्या
प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला.  
         
सर्वसामान्य कुटुंबातून येऊन गोपीचंद पडळकर आमदार झालेने प्रस्थापित लोकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे असे शिवशक्तीचे अध्यक्ष प्रमोद मांडवे म्हणाले. श्री. मांडवे पुढे म्हणाले, जातीयवाद पेरून स्वतः सत्ता भोगायची पद्धत गोपीचंद पडळकर यांनी लोकांच्यात स्वाभिमान निर्माण करून बंद केल्यामुळे प्रस्थापितांचे दुकान बंद झाले आहे. म्हणून बहुजन-मराठा-धनगर असा वाद पेटवून स्वतःची पोळी भाजायचा डाव प्रस्थापित मंडळिणी आखला आहे. परंतु आता समाज साक्षर झाला आहे. सर्व बहुजन समाज शेवटच्या श्वासापर्यंत गोपीचंद पडळकर यांच्या सोबत आहे.
          यावेळी विक्रम गोरड, श्रीकांत महाडीक, रोहित मांडवे, अतिष रास्कर, गणेश मांडवे, उमाजि जाधव, वैभव हनमर, राहुल रास्कर, तेजस रास्कर, गणेश रास्कर, संपतराव मोरे व गोपीचंद पडळकर समर्थक उपस्थित होते.

धनगर समजा विषयी जातिवाचक पोस्ट टाकनाऱ्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन : विकास माने 
kadegaon
तहसील कार्यालय कडेगांव येथे धनगर समाज
व गोपीचंद पडळकर समर्थक यांचेवतीने निवेदन
देनेत आले

धनगर समजावीषयी सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या लोकावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा राज्यभर धनगर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असे  सकल धनगर समाज आरक्षण संयोजन समिति कडेगांव तालुका अध्यक्ष विकास माने यांनी इशारा दिला. यावेळी ते म्हणाले जितेंद्र आव्हाड यांनी राजे मल्हारराव होळकर यांच्याविषयी तसेच धनगर समजविषयी अपशब्द काढले. त्यांच्यावर कारवाई करावी आणि सोशल  मिडियावर धनगर समाजविषयी जातिवाचक बोलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. अन्यथा आंदोलन करू. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785