गोपीचंद पडळकरांवर टीका करणाऱ्यास जशास तसे उत्तर देऊ : प्रमोद मांडवे - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Sunday, June 21, 2020

गोपीचंद पडळकरांवर टीका करणाऱ्यास जशास तसे उत्तर देऊ : प्रमोद मांडवे

आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक टीका करीत आहेत. प्रस्थापितांची हुजरेगीरी करणारे गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करून प्रसिद्धी मिळवू पाहत आहेत. आ. गोपीचंद पडळकर यांच्यावरची टीका खपवून घेणार नाही. जशास तसे उत्तर देऊ असा इशारा शिवशक्तीचे अध्यक्ष प्रमोद मांडवे यांनी दिला. 


pramod mandave
श्री. प्रमोद मांडवे 
  प्रमोद मांडवे म्हणाले, गोपीचंद पडळकर यांना मानणारा वर्ग सांगली जिल्ह्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याची अपेक्षा काही विघ्नसंतोषी करत आहेत. गोपीचंद पडळकर हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते आमदार झाल्याने काही लोकांच्या पोटात दुखू लागले आहे. गोरगरीब-शेतकरी आणि कष्टकऱ्यांची पोरं आमदार-लोकप्रतिनिधी होऊ नयेत यासाठी महाराष्ट्रातील अनेक प्रस्थापित घराणी प्यादा पुढे करून रडीचा डाव खेळत आहेत. 
          गोपीचंद पडळकर यांनी सर्वसामान्य लोकांच्या हक्कांसाठी अनेक वर्षापासून संघर्ष केला आहे. अनेक वेळा सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आहे. असे संघर्षातून निर्माण झालेले लोकनेते म्हणजे गोपीचंद पडळकर आहेत. ते शासन आणि प्रशासन यांच्याशी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी झगडतात. त्यामुळेच सामान्य जनता त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी मराठा-धनगर आरक्षणासाठी मोर्चे-आंदोलने केली. तसेच पुरग्रस्तांसाठी प्रत्यक्ष ग्राऊंड लेवलला जाऊन मदत केली. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाढ झाली. हे काही प्रस्थापित मंडळीना बघवत नाही. 
सर्वसामान्य लोकांनी नेतृत्व करू नये. राजकारणात येऊ नये. प्रस्थापितांची कायम हुजरेगीरी करावी यासाठी आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर प्यादे पुढे करून टीका करणे आणि प्रसिद्धी मिळवणे असे डाव आखले आहेत. आ. गोपीचंद पडळकरांवर टीका करणाऱ्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा श्री. मांडवे यांनी दिला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785