पुणे पदवीधर मतदारसंघातून सारंग पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी द्यावी : सुरज निकम - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Monday, June 22, 2020

पुणे पदवीधर मतदारसंघातून सारंग पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी द्यावी : सुरज निकमShri Sarang Patil
श्री. सारंग पाटील 
पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सारंग पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शरद पवार विचार मंच सांगली जिल्हा अध्यक्ष सुरज निकम यांनी केली आहे. 
Shri Suraj Nikam
श्री. सुरज निकम 
लवकरच पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सारंग बाबा पाटील यांना पुणे पदवीधर मतदार संघातून उमेदवारी द्यावी या मागणीचे पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुरज निकम म्हणाले, सारंग पाटील हे एक उच्चशिक्षित निष्ठावंत, सुसंस्कृत तरुण आहेत. त्यांनी सनबीम उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो युवकांना नोकरी दिली आहे. माहिती व तंत्रज्ञान या सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी उत्तम आहे. 
२०१४ च्या पदवीधर निवडणुकीमध्ये पक्षातीलच काही जणांनी बंडखोरी केल्यामुळे पराभव झाला परंतु त्यांनी खचून न जाता गेल्या सहा वर्षांमध्ये पदवीधरांसाठी केलेले काम उल्लेखनीय आहे. पदवीधराना न्याय मिळण्यासाठी सारंग पाटील यांना मा. शरद पवार यांनी पुन्हा एकदा पदवीधरसाठी संधी द्यावी अशी मागणी सुरज निकम यांनी केली आहे. महा विकास आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणे सारंग पाटील यांचा विजय होईल यात काही शंका नसल्याचे त्यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785