शिवाजीनगर येथील नराधमाना फाशीची शिक्षा द्या : महिला संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Saturday, June 6, 2020

शिवाजीनगर येथील नराधमाना फाशीची शिक्षा द्या : महिला संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

शिवाजीनगर ता. कडेगांव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाना फाशीची शिक्षा द्या. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या शैलजाभाभी पाटील, अॅड. मनीषाताई रोटे, कराड येथील मराठा क्रांति मोर्चाच्या वैशाली जाधव, ज्योति शिंदे, भारती पवार, शिवाजीनगरचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांनी केली आहे. पोलिस निरीक्षक विपिन हसबणीस यांची भेट घेऊन सर्व प्रकारची माहिती त्यांनी घेतली.
तसेच पीडित कुटुंबियांची भेट घेऊन पीडित मुलगी व कुटुंबियांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी शैलजा भाभी पाटील म्हणाल्या, झालेला प्रकार निंदनीय असून सदर पीडित कुटुंबाच्या पाठीशी आम्ही आहे. गुन्हेगाराना कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही प्रशासकीय दरबारी मागणी केली आहे. 

मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत मिळण्यासाठी सहकार्य करू : मराठा क्रांति मोर्चा समन्वयक वैशाली जाधव 
शासनाकडून पीडित मुलीला मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत देण्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न करू असे मराठा क्रांति मोर्चा समन्वयक वैशाली जाधव  यांनी सांगितले. 

बलात्कार करणाऱ्या नराधमाना जामीन झाल्यास जामीनदाराच्या घरापुढे आंदोलन 
सामाजिक कार्यकर्त्या अ ॅड. मनीषा रोटे यांनी बलात्कार करणाऱ्या नराधमाना जामीन झाल्यास त्याच्या घरापुढे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच पीडित महिला आणि कुटुंबियाणा शासकीय मदत तसेच न्याय देण्यासाठी सर्वोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 
No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785