'ही लोकशाही आहे, इथं लोकांना गृहित धरून चालत नाही' - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Friday, July 10, 2020

'ही लोकशाही आहे, इथं लोकांना गृहित धरून चालत नाही'

मुंबई: 'महाराष्ट्रातील सत्ताबदल हा अपघात नव्हता. राज्यातील राजकीय चित्र बदलण्याचा लोकांचाच मूड होता. महाराष्ट्र आमच्याच विचारानं चालणार हा आधीच्या राज्यकर्त्यांचा दर्प लोकांना आवडला नव्हता. 'मी पुन्हा येईन' असं सांगून लोकांना गृहित धरलं गेलं. लोकशाहीत लोकांना गृहित धरलेलं चालत नाही. महाराष्ट्रातील जनतेची हीच भावना झाली होती. त्यातून त्यांनी गृहित धरणाऱ्यांना धडा शिकवला,' असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष यांनी माजी मुख्यमंत्री यांच्यावर केला. ( Slams in Saamana Interview) वाचा: शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'साठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात पवार यांनी लॉकडाऊनपासून सरकारच्या रिमोट कंट्रोलपर्यंतच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा भाजप-शिवसेनेचंच सरकार येईल असं चित्र होतं. भाजप तर स्वबळावर सत्ता काबिज करण्याच्या प्रयत्नात होता. प्रत्यक्षात काँग्रेस-राष्ट्रवादीनं मोठी मुसंडी मारल्यानं भाजपची पीछेहाट झाली. पुढं वेगळ्या घडामोडी घडून भाजप सत्तेतूनच बाहेर फेकली गेली. या सत्ताबदलाची कारणंही पवारांनी यावेळी विषद केली. '२०१९च्या लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेनं देशाशी सुसंगत असाच निर्णय घेतला होता. मात्र, राज्याचा प्रश्न आला तेव्हा चित्र नेमकं वेगळं होतं. केवळ महाराष्ट्रच नव्हे, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड इथंही वेगळं चित्र होतं. मागील पाच वर्षे महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचं सरकार होतं. पण शिवसेनेच्या विचारांच्या मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता होती. शिवसेनेची कामाची एक वेगळी पद्धत आहे. त्यांना त्या पद्धतीनं पुढं जायला आवडतं. भाजपच्या काळात शिवसेनेला गप्प कसं करता येईल हेच पाहिलं गेलं. महाराष्ट्राच्या जनतेसाठी ही पाच वर्षे भाजपचं सरकार असल्यासारखीच होती. मनोहर जोशींच्या काळातही युती सरकार होतं. पण नेतृत्व शिवसेनेकडं असल्यानं तेव्हा असं कधी होत नव्हतं. याउलट मागच्या पाच वर्षात भाजपनं शिवसेनेला जवळपास बाजूला सारलं होतं. हे महाराष्ट्राच्या जनतेला पचत नव्हतं. त्याचा परिणाम मतपेटीतून दिसला,' असं पवार म्हणाले. वाचा: इंदिरा गांधींनाही पराभव पाहावा लागला! 'लोकशाहीत कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नसतं. मतदारांना गृहित धरलेलं सहन होत नाही. इंदिरा गांधींसारख्या लोकप्रिय नेतृत्वाला देखील पराभव पाहावा लागला होता. लोकशाहीतील अधिकाराच्या बाबतीत देशातील सामान्य माणूस राजकारण्यांपेक्षा जास्त शहाणा आहे. त्या चाकोरीच्या बाहेर कोणी पाऊल टाकताना दिसला की तो त्याला धडा शिकवतो,' असा चिमटा पवारांनी फडणवीसांना काढला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eigRZ5

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785