
मुंबई: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून अवघ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आज दिलं. राज्यातील सरकारचे आपण हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल? हा तो प्रश्न होता. पवारांनी अगदी उदाहरणासह यावर भाष्य केलं आहे. (I am not the headmaster or remote control of Thackeray sarkar, clears ) शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ''साठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात पवार यांनी लॉकडाऊनपासून आघाडी सरकारच्या कथित रिमोट कंट्रोलपर्यंतच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरही हे सरकार पडद्यामागून शरद पवारच चालवत आहेत, अशी एक चर्चा होती. शरद पवार हे विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी बैठका घेत असल्यानं तो समज मागील काही दिवसांत बळकट झाला होता. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडूनही संदिग्ध वक्तव्ये करून यास हवा दिली जात होती. संजय राऊत यांनी पवारांना त्याबद्दल विचारलं. महाविकास आघाडी सरकारचे आपण हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर मी यापैकी दोन्हीही नाही, असं स्पष्ट उत्तर शरद पवार यांनी दिलं. 'मी राज्यातील सरकारचा हेडमास्तर असण्याचं काही कारण नाही. त्यासाठी आधी सरकारमध्ये असलं पाहिजे. मी सरकारमध्येच नसल्यानं तशी शक्यता नाही. रिमोट कंट्रोलचं म्हणाल तर सरकार किंवा प्रशासन हे कधी रिमोट कंट्रोलनं चालत नाही. लोकशाहीमध्ये तर नाहीच नाही,' असं ते ठामपणे म्हणाले. रशियाचे सत्ताधारी नेते व्लादिमीर पुतीन यांचा दाखला त्यांनी आपलं म्हणणं स्पष्ट करताना दिला. 'रशियात पुतीन हे २०३६ पर्यंत अध्यक्ष राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. लोकशाही वगैरे त्यांनी बाजूलाच सारली आहे. अशा ठिकाणी रिमोटचा वापर होतो. आपलं सरकार हे लोकशाही सरकार आहे. इथे रिमोट चालत नाही,' असं पवारांनी स्पष्ट केलं.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38MMYiA
No comments:
Post a Comment