अमित ठाकरेंवर मनसे टाकणार मोठी जबाबदारी? - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Tuesday, January 12, 2021

अमित ठाकरेंवर मनसे टाकणार मोठी जबाबदारी?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसे अध्यक्ष यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्व नेत्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, या बैठकीत मनसे नेते यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाल्याचे कळते. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी राज्याच्या प्रत्येक भागातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरात कामाला लागावे, असे आदेशही राज यांनी यावेळी दिले. निवडणुकांच्या दृष्टीने लवकरच आणखी एक बैठक घेण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले. दरम्यान, यावेळी अमित ठाकरे यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याविषयी चर्चा झाल्याचे समजते. राज ठाकरे यांनी मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या यावेळी संवाद साधला. 'मनसे'कडून प्रत्येक महापालिका क्षेत्रासाठी सरचिटणीस आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची समिती तयार केली जाणार आहे. या सगळ्या समित्यांचा कारभार हाताळण्याची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर सोपवली जाणार असल्याचे समजते. दरम्यान, अलिकडेच पक्षाचा नवा झेंडा आणि नव्या अजेंड्यासह मनसेचे रिलाँचिंग करताना अमित ठाकरे यांना पहिल्यांदाच मनसेच्या व्यासपीठावर सक्रिय स्थान देण्यात आले होते. त्यावेळी अमित ठाकरे यांचे लाँचिंग झाले असले, तरी त्यानंतर ते कार्यकर्ते आणि सामान्यांच्या भेटीगाठी वगळता फारसे सक्रिय दिसून आले नव्हते. मात्र, आता महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने त्यांच्यावर थेट एखादी जबाबदारी टाकली जाणार असल्याचे समजते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i8UJDW

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785