नायलॉन मांजा वापरल्यास थेट तुरुंगात जावे लागणार - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Tuesday, January 12, 2021

नायलॉन मांजा वापरल्यास थेट तुरुंगात जावे लागणार

म. टा. खास प्रतिनिधी पक्षी, प्राण्यांसह नागरिकांच्या जिवालाही धोकादायक ठरणाऱ्या चिनी आणि नायलॉन मांजाच्या विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. मात्र तरीही अशा जीवघेण्या मांजाची छुपी विक्री, वापर आणि साठवणूक केली जात असल्याने पोलिस सतर्क झाले आहे. परिसरात पत्रके लावून तसेच मेगाफोनद्वारे याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आला आहे. ही बंदी झुगारून नायलॉन मांजाचा वापर करताना कुणी आढळल्यास बंदी आदेश न पाळल्याबद्दल गुन्हा दाखल होऊन तुरुंगवासही होऊ शकतो, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सक्रांतीच्या काळात पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. या धोकादायक मांजामुळे या कालावधीत अनेक पक्षी, प्राणी जखमी होतात, तर काही मृत्युमुखी पडतात. त्यामुळे राज्य सरकारने १९८६च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५नुसार या मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. तरीही या मांजाची विक्री आणि वापर सर्रास सुरू असतो. अशा विक्रेत्यांवर आणि मांजा वापरणाऱ्या पतंगप्रेमींवर मुंबई पोलिसांची बारीक नजर असेल. आधीच बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांवर संक्रांत कोसळली असताना मांजामुळे पक्ष्यांचे जीव जाऊ नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे. ...अन्यथा गुन्हा नायलॉन किंवा चिनी मांजा वापरताना अगर विक्री करताना कुणी आढळल्यास बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल होईल. हा जामीनपात्र गुन्हा असला, तरी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एक महिना कारावास किंवा दंड तसेच दोन्ही शिक्षा होऊ शकतात. या मांजामुळे कुणी जखमी झाल्यास भादंविच्या इतर कलमांनुसारही कारवाई केली जाऊ शकते, असे पोलिसांनी म्हटले आहे. हळदीकुंकू समारंभासाठीही खबरदारी संक्रांत सणाचे औचित्य साधून घरोघरी, संस्था, कार्यालये तसेच राजकीय पक्षांच्या वतीने अनेक ठिकाणी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले जाते. यासाठी महिला मोठ्या संख्येने नटूनथटून घराबाहेर पडतात. त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये यासाठी या कालावधीत ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवून चोरी, सोनसाखळी चोरी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देशही सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38BTSsb

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785