घरच्यांनाही नाही अनुष्काला भेटण्याची परवानगी, वाढवली सिक्युरिटी - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Tuesday, January 12, 2021

घरच्यांनाही नाही अनुष्काला भेटण्याची परवानगी, वाढवली सिक्युरिटी

मुंबई- ११ जानेवारीला आणि एका मुलीचे आई- बाबा झाले. विराटने सोशल मीडियावर चाहत्यांना ही बातमी दिली. ही आनंदाची बातमी देतानाच त्याने थोडी प्रायव्हसी द्यावी अशी विनंतीही चाहत्यांकडे केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या जवळच्या नातेवाईकांनाही इस्पितळात अनुष्काला भेटण्याची परवानगी नसल्याचं सांगितलं जात आहे.करोना व्हायरसमुळे कडक केली सुरक्षा अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे देशातलं स्टार कपल आहे. विराटने अनुष्काच्या प्रेग्नन्सीची बातमी दिली लाखो लोकांनी त्याचं ट्वीट रिट्वीट आणि लाइक केलं. मुंबईच्या ब्रीच कॅण्डी इस्पितळात तिने एका मुलीला जन्म दिला. यावेळी विराट-अनुष्काने इस्पितळातून कोणाकडूनही फुलं किंवा भेटवस्तू न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड वातावरणात दोघांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. कोणीही फोटो काढू नये याची सक्त ताकीद एवढंच नाही तर इस्पितळातील कर्मचार्‍यांना फोटो न काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इस्पितळातली सुरक्षाही आधीपेक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. जे लोक आजूबाजूच्या रूम्समध्ये अॅडमिट आहेत त्यांना भेटायला येणाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना मुलीची झलक दिसू नये याची खास सोय करण्यात आली आहे. इस्पपितळाच्या बाहेर छायाचित्रकारांची असलेली गर्दी पाहून अनुष्का आणि मुलीला मागच्या दाराने घरी पाठवण्याचा विचार केला जात असल्याचंही बोललं जात आहे.


source https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/no-relatives-and-gifts-allowed-for-anushka-sharma-and-virat-kohli/articleshow/80245327.cms

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785