
मुंबईः राज्यीत १६ जानेवारीपासून करोना लसीकरणाची मोहिम राबवण्यात येणार आहे. लसीकरणासाठी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आज पोहोचवले जाणार आहेत. या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात किती जणांना लस दिली जाणार, लसीकरणासाठी राज्यानं कशी तयारी केली आहे? या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री यांनी माहिती दिली आहे. 'केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार राज्यामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार १८ वर्षांखालील व्यक्ती, गरोदर महीला, तसेच कोणत्याही ऍलर्जी असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार नाही,' अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच, लसीकरणाच्या या कार्यक्रमात अॅक्टिव्ह रुग्णांनी लस तूर्तास देण्यात येणार नाही कारण आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लस देण्यात यावी, असं केंद्रानं बंधनकारक केलं आहे. असंही ते म्हणाले. 'मी दोन दिवसांपूर्वीच करोना लसीकरणासाठी ५११ केंद्रावर नियोजन केलं होतं. पण काल झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने इतक्या मोठ्या स्तरावर लसीकरण करु नका असं सांगितलं. त्यामुळं ५११ वरुन ही संख्या ३५० केली आहे,' असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. शिवाय, 'प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० अशा पद्धतीने पहिल्या दिवशी ३५ हजार जणांना लस देण्याचा आमचा प्रयत्न आहे,' अशी माहितीही त्यांनी दिली आहे. 'करोना लस महाराष्ट्रात आली असून १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात होत आहे. मला समाधान आहे. आपण आठ लाख लोकांना कोविन अॅपवर अपलोड केलं आहे. त्याच्या तुलनेत लस कमी आली आहे. जी लस आलेली आहे ती आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये पोहोचेल,' अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी एकूण ९ लाख ७३ हजार लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. बफर स्टॉकसहित आपल्याला १७ ते साडे सतरा डोसची गरज आहे. आज त्यापैकी नऊ ते साडे नऊ लाख आले आहेत. याचा अर्थ ते कमी आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार लसीकरण करणाऱ्या व्यक्तीला २ डोस दिले जाणार आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यानं एक डोस दिल्यानंतर ४ ते ६ सहा आठवड्याच्या अंतरानं दुसरा डोस दिला जाणार आहे. त्या प्रमाणे राज्यात ५५ टक्के लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2LMv1Jc
No comments:
Post a Comment