सत्य साई बाबा यांच्या लुकमधल्या या गायकाला तुम्ही ओळखलं का? - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Wednesday, January 13, 2021

सत्य साई बाबा यांच्या लुकमधल्या या गायकाला तुम्ही ओळखलं का?

मुंबई- काही दिवसांपूर्वी गायक यांनी यांच्या बायोपिक साइन केला असल्याचं सांगितलं होतं. आता त्यांनी या भूमिकेचा लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता त्यांच्या लुकचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात ते हुबेहूब सत्य साई बाबासारखे दिसत आहे. या सिनेमात अनूप आध्यात्मिक गुरु सत्य साई बाबाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात त्यांची मुख्य भूमिका आहे. विक्की रनौत दिग्दर्शित या सिनेमाचं पोस्टर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियरी यांनी प्रसिद्ध केलं. सध्या सोशल मीडियावर अनूप यांच्या या लुकची चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत त्यांनी विचारलं की, 'माझा हा लुक तुम्हाला कसा वाटला? मी सत्य साई बाबा' जॅकी श्रॉफ यांचीही असेल महत्त्वाची भूमिका या सिनेमातत जॅकी श्रॉफही दिसणार आहेत. हा सिनेमा साइन केल्यानंतर अनूप जलोटा यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, 'मला आनंद आहे की सत्य साई बाबांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या तत्वांवर आणि आदर्शांवर माझा विश्वास आहे. मी त्यांच्याबद्दल वाचलंही आहे. त्यांचं पात्र साकारण्यासाठी बरीच माहिती गोळा केली होती. त्यांची व्यक्तिरेखा साकारणं खूप आव्हानात्मक आहे.' अनूप जलोटा व्यतिरिक्त सिनेमात जॅकी श्रॉफ, गोविंद नामदेव, अरुण बक्षी आणि साधिका रंधावा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.


source https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/anup-jalota-in-sathya-sai-baba-role-first-look/articleshow/80245827.cms

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785