तुझा मास्क पाहून करोना पळून जाईल... रणवीरच्या अतरंगी लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Wednesday, January 13, 2021

तुझा मास्क पाहून करोना पळून जाईल... रणवीरच्या अतरंगी लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

मुंबई : बॉलिवूड अभिनेता त्याच्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. रणवीर हा बॉलिवूडमधील कदाचित एकमेव असा अभिनेता आहे, जो नेहमीच आत्मविश्वासानं चित्रविचित्र फॅशन फॉलो करताना दिसतो. कपड्यांची रंगसंगती, डिझाइन असो किंवा मग ज्वेलरी; या अभिनेत्याची फॅशन जरा निराळीच असते. त्याचा फॅशनेबल अवतार कदाचित आपल्या डोळ्यांना खटकू शकतो. नेटकरी त्याला ट्रोलही करतात. रणवीरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातही त्याच्या अतरंगी अवतार पाहायला मिळतोय. कपड्यांसोबतच रणवीरच्या हटके मास्कचीही चर्चा सुरू आहे. रणवीर नुकताच एका डबिंग स्टुडिओच्या बाहेर दिसला होता. त्यानं निळ्या रंगाचा ट्रॅकसूट घातला होता. तसंच काळ्या रंगाचा त्याचा मास्क सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. रणवीरचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देत त्यांची खिल्ली उडवली आहे. करोनाला तरी घाबरत जा...असं एकानं म्हटलं आहे. तर, तुझा लूक पाहून करोनाही पळून जाईल, असं एकानं म्हटलं आहे.


source https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/ranveer-singh-makes-heads-turn-in-neon-tracksuit-funky-sunglasses-trolled-on-social-media/articleshow/80249669.cms

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785