राष्ट्रवादीला धक्का! ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयाला समन्स - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Tuesday, January 12, 2021

राष्ट्रवादीला धक्का! ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयाला समन्स

मुंबई: ड्रग्ज पुरवठा प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध 'मुच्छड पानवाला'चा मालक रामकुमार तिवारी याला अटक केल्यानंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं () राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांचे जावई यांना समन्स धाडलं आहे. समीर खान यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यामुळं गदारोळ उठला असतानाच मलिक यांच्या जावयाला समन्स आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता वाढली आहे. ( Summoned 's Son-in-law ) वाचा: समीर हे नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती आहेत. समीर खान आणि करण संजानी यांच्यात 'गुगल पे'च्या माध्यमातून २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. ड्रग्ज पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाला आहे, असा संशय एनसीबीला आहे. याच संदर्भात चौकशीसाठी समीर खान यांना बोलावण्यात आलं आहे. वाचा: एनसीबीच्या पथकानं मागील आठवड्यात खार परिसरातून ब्रिटिश नागरिक करण संजानी व राहिल फर्निचरवाला यांना अटक केली होती. त्यांच्याकडून २०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. समीर खान यांचा संजानी व फर्निचरवाला यांच्याशी नेमका काय संबंध आहे? संजानी यांच्याशी समीर यांच्यात २० हजार रुपयांची देवाणघेवाण का झाली होती?,' याची माहिती एनसीबीकडून घेतली जाणार आहे. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात नाव आलेल्या 'मुच्छड पानवाला'चा मालक रामकुमार तिवारी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qlPpQJ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785