
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्यात चर्चेला उधाण आलं आहे. भाजपनंही यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीला घेरलं आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटतं. माझी इच्छा असणारचं असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही ट्विटच्या माध्यमातून रोहित पवारांना लक्ष्य केलं आहे. 'आता महाविकास आघाडीत फक्त राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडायची बाकी आहेत,' असा टोला भातखळकरांनी लगावला आहे. अजित पवारांचं सूचक वक्तव्य जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेबाबत अजित पवार यांनी जयंत पाटलांनी जी काही इच्छा प्रदर्शित केली आहे त्याला मी पाठिंबा देतो,' असं सूचक वक्तव्य केलं आहे. जयंत पाटील काय म्हणाले होते एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती. 'आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रीपद आलेलं नाही. माझी इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटणारचं. पण, पक्ष म्हणजे शरद पवार हे जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा आहे. मला वाटतं सगळ्यानांच असेल, असं जयंत पाटील म्हणाले होते.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39UII14
No comments:
Post a Comment