कोव्हिशील्ड लसीचा पहिला साठा मुंबईत; आता प्रतीक्षा लसीकरणाची - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Tuesday, January 12, 2021

कोव्हिशील्ड लसीचा पहिला साठा मुंबईत; आता प्रतीक्षा लसीकरणाची

मुंबई: करोनावरील बहुप्रतिक्षित लसीचा पहिला साठा आज मुंबईत पोहोचला आहे. सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या लसीचे १ लाख ३९ हजार ५०० डोस आज पहाटे साडेपाच वाजता मुंबईत आणले गेले. हा साठा पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात सुरक्षितपणे ठेवण्यात आला आहे. ( in ) कडेकोट पोलीस बंदोबस्तात लसीचा हा साठा मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पुण्याहून आणला. देभभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू होत आहे. त्यासाठीच्या पहिल्या टप्प्यातील साठा दाखल होत असला तरी पालिकेच्या कांजुरमार्ग येथील मार्केट इमारतीत लशींसाठी कोल्ड स्टोरेज काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळं लस साठवणूक करण्याची व्यवस्था पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात करण्यात आली आहे. कांजुरमार्ग येथील कोल्डस्टोरेजची क्षमता एकाच वेळी सुमारे एक कोटी लशींच्या साठवणुकीची आहे. तर एफ दक्षिण विभाग कार्यालयातील लस क्षमता १० लाख इतकी आहे. दोन लाख जणांना लस मुंबईत सव्वा लाख आरोग्य कर्मचारी आणि इतर संबंधित कर्मचारी अशा २ लाख व्यक्तींची नावे कोविन अॅपवर नोंदवण्यात आली आहेत. या दोन लाख जणांना लस दिली जाईल. शाळा, सभागृहांचाही उपयोग मुंबईत केईएम, नायर, सायन, कूपर, राजावाडी, व्ही. एन. देसाई, भाभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी रुग्णालयांत लसीकरण प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे, बीकेसीतील केंद्रासह पालिका रुग्णालये, आरोग्य केंद्रे, दवाखाने, आरोग्य केंद्रामध्येही लसीकरण होणार आहे. त्या जोडीला पुढील कालावधीत शाळा आणि परिसरातील सभागृहांचाही त्यासाठी उपयोग केला जाईल. प्रशिक्षणावर भर लसीकरण यशस्वी व्हावे यासाठी पालिकेने २७५ मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. त्या मदतीने २,५०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. लसीकरण वेगवान आणि सुरक्षित होण्यासाठी आणखी १० हजार कर्मचाऱ्यांची निवड झाली असून त्यातील ५ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणदेखील पूर्ण झाले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38BrsyK

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785