
नाशिकः ' यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षानं तातडीने दखल घ्यावी, असं स्पष्ट मत राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी मांडले आहे.' फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर असून प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली होती. या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण चांगलेचं रंगले आहे. भाजपनं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. 'धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वतः कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं आहे. मुंडे यांनी या प्रकरणी कोर्टत गेल्याचं सांगितलंय, असं संशयाचं वातावरण राहणं योग्य नाही. त्यामुळं पोलिसांनी सर्व माहिती, सत्य बाहेर आणावं,' अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. 'जे दुसऱ्या पक्षात गेले ते वाईट असं म्हणणार नाही. अजूनही काही परत पक्षात येण्याच्या वाटेवर आहेत. २०१४ला ते नसतानाही सत्ता आलीच होती. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक पक्षात, पक्षविस्तार होतच असतं,' असं म्हणत पक्षांतर केलेल्या नेत्याबाबत फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. 'औरंगाबादचं नामांतराचा मुद्दा म्हणजे हे डुप्लिकेट काम असल्याचं म्हणतं फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच, नामांतरावरुन शिवसेना आणी काँग्रेस यांची मिली जुली कुस्ती असल्याचा,' टोलाही त्यांनी लगावला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oHTfmy
No comments:
Post a Comment