जुन्या अंदाजात पण नव्या दमात जबरदस्त एण्ट्री घेणार मनोज बाजपेयी - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Wednesday, January 13, 2021

जुन्या अंदाजात पण नव्या दमात जबरदस्त एण्ट्री घेणार मनोज बाजपेयी

मुंबई- आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट हिंदी वेब सीरिजबद्दल जर आपण चर्चा केली तर त्यात यांची मुख्य भूमिका असलेल्या '' सीरिजचा आवर्जुन उल्लेख केला जाईल. या मालिकेचा पहिला सीझन चांगलाच गाजला होता. आता दुसरा सीझनही पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 'द फॅमिली मॅन' सीझन २ चा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे.टीझरमध्ये पुढची कथा काय असणार याची थोडीसी झलक दाखवण्यात आली आहे. श्रीकांत म्हणजेच मनोज बाजपेयी यांचं कौटुंबिक जीवन फारसं चांगलेलं दिसत नाही. या सगळ्यात तो कोणालाही न सांगता तो सर्वांपासून दूर जातो. त्याची पत्नी आणि मुलं त्याला फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न करतात दिसतात. तर टीझरच्या शेवटच्या भागात मनोजची छोटीशी झलक दिसते. कोणालाही न सांगता तो एका मिशनवर असल्याचं यात दिसून येतं. इथे पाहा टीझर: तेलगू अभिनेत्री समंथा अक्कीनेनी ‘द फॅमिली मॅन’ च्या दुसर्‍या सीझनधून डिजिटल डेब्यू करणार आहे. या सीरिजमध्ये मनोज आणि समंथाशिवाय श्रेया धन्वंतरी, प्रियामनी आणि सनी हिंदुजा देखील आहेत. १९ जानेवारीला दुसर्‍या सीझनचा ट्रेलर रिलीज होणारअसल्याचंही या टीझरमध्ये सांगण्यात आलं आहे. द फॅमिली मॅन सीझन २ वेब सीरिज १२ फेब्रुवारी २०२१ रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.


source https://maharashtratimes.com/entertainment/web-series/manoj-bajpayee-the-family-man-season-2-web-series-teaser-released/articleshow/80248218.cms

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785