ट्रॉफी जिंकल्यावर आईने केलं रुबीनाचं जोरदार स्वागत, पाहा व्हिडीओ - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Monday, February 22, 2021

ट्रॉफी जिंकल्यावर आईने केलं रुबीनाचं जोरदार स्वागत, पाहा व्हिडीओ

मुंबई: बिग बॉसच्या घरात १४० दिवस घालवल्यानंतर विजेती अखेर तिच्या घरी परतली. तिच्या स्वागतासाठी पती आणि तिच्या आईने जोरदार तयारी केली होती. रुबीनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अभिनव आणि त्याची फॅमिली लेडी बॉस रुबीनाचं जोरदार स्वागत करताना दिसत आहेत. ज्यात तिची आईसुद्धा आहेत. रुबीना रात्री उशीरा घरी पोहोचली आणि तिच्या स्वागतासाठी घरातील सर्वजण जागे होते. ती घरी पोहोचण्याआधीच अभिनवनं घर सुंदर पद्धतीनं सजवलं होतं. एकीकडे गॅलरीमध्ये लाइटिंगने RUBI नाव चमकत आहे. तर दुसरीकडे हॉलमध्ये लाइट्स आणि फुलांची सुंदर सजावट केली आहे. यासोबतच भिंतीवर रुबीनाच्या स्वागतासाठी, 'वेलकम होम, बॉस लेडी' असं लिहिलं आहे. रुबीनानं घरातील हा व्हिडीओ शेअर करत तिच्या फॅमिलीनं तिचं कसं स्वागत केलं हे दाखवलं आहे. रुबीनानं घराची एक झलक इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिलं, 'आपल्या घरासारखं दुसरं काही असूच शकत नाही.' याशिवाय अभिनवनेही त्याच्या इन्स्टाग्रामवर रुबीनाचा फोटो शेअर करताना लिहिलं, 'माय विनर रुबीना' अर्थात रुबीना बिग बॉस विनर होणं हा फक्त रुबीनासाठी नाही तर अभिनवसाठीसुद्धा अभिमानाचा क्षण होता. जेव्हा सलमाननं विजेता म्हणून रुबीनाचं नाव घेतलं त्यावेळी अभिनवच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. बिग बॉसच्या घरात रुबीनानं त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी अनेक खुलासे केले होते. ज्यात ती आणि अभिनव घटस्फोट घेण्याच्या निर्णयाप्रत आले होते असंही तिनं सांगितलं होतं. मात्र शोची विजेती झाल्यावर दिलेल्या मुलाखतीत 'या शोमुळे माझं आणि अभिनवचं नातं अधिक घट्ट झालं' असंही रुबीनानं सांगितलं.


source https://maharashtratimes.com/entertainment/bigg-boss-14-winner-rubina-dilaik-warm-welcome-by-her-husband-and-family/articleshow/81166047.cms

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785