मोदींच्या नावाने बोगसअॅप; एक-दोन नव्हे, अडीच लाख लोकांना फसवले - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Monday, February 22, 2021

मोदींच्या नावाने बोगसअॅप; एक-दोन नव्हे, अडीच लाख लोकांना फसवले

: पंतप्रधान तसेच शासनाच्या नावाने बोगस ॲप तयार करून देशभरातील सुमारे अडीच लाख लोकांना फसविणाऱ्या रॅकेटचा मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी याप्रकरणी राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथून चार जणांना अटक केली असून या चौघांनी ४ ते ५ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. कर्ज देतो सांगून प्रोसेसिंग फी, नोंदणी फी च्या नावाखाली ही टोळी सर्वसामान्य लोकांकडून पैसे उकळत होती. वाचा: पुण्यातील सूरज सावळे या तरुणाला कर्जासाठी दिलेली प्रोसेसिंग फी परत करण्याबाबत वारंवार फोन तसेच, धमकीचे संदेश येत होते. सूरज याने याबाबत तक्रार केल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल करून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासादरम्यान पोलिसांना यामध्ये काही ॲपच्या लिंक आणि मोबाइल नंबर मिळाले. हे आरोपी उत्तर प्रदेशच्या अलिगढ येथून लोकांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे यातील एक आरोपी राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे समजले. उपायुक्त रश्मी करंदीकर आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक शर्मिला सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष मस्तूद, अलका जाधव यांच्यासह सुरवसे, देसाई यांच्या पथकाने संजीवकुमार विरी सिंह, प्रांजल राठोड, रामनिवास कुमावत आणि विवेक शर्मा या चौघांना उत्तर प्रदेश आणि राजस्थान येथून अटक केली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2NLmiIp

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785