तब्येतीची विचारपूस करणाऱ्या फोटोग्राफर्सवर भडकला कपिल शर्मा - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Monday, February 22, 2021

तब्येतीची विचारपूस करणाऱ्या फोटोग्राफर्सवर भडकला कपिल शर्मा

मुंबई: कॉमेडियन २२ फेब्रुवारीला मुंबई एअरपोर्टवर व्हिलचेअरवर बसून बाहेर निघताना दिसला होता. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्याच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहून सर्वच हैराण झाले होते. पण आता कपिलचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात काही फोटोग्राफर्सनी कपिलच्या तब्येतीची विचारपूस करताच कपिल त्यांच्यावर भडकलेला दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कपिल व्हिलचेअरवर बसून जात असताना काही फोटोग्राफर्स फोटो क्लिक करताना कपिलची विचारपूस करताना दिसत आहेत. ते म्हणतात, हॅलो कपिल सर कसे आहात तुम्ही, 'आम्ही व्हिडीओ शूट करत आहोत.' त्यानंतर कपिल त्यांना म्हणतो, 'तुम्ही आधी सर्वजण बाजूला व्हा इथून...' यावर ते फोटोग्राफर्स कपिलचे आभार मानत बाजूला होतात. पण थोडं पुढे गेल्यावर कपिल त्यांना 'उल्लू के पठ्ठे' असं म्हणतो. जे या व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झालं आहे. 'हे सर्व रेकॉर्ड झालं आहे' असं जेव्हा एक फोटोग्राफर कपिलला सांगतो त्यावर कपिल म्हणतो, 'करा रेकॉर्ड सर्वजण बेशिस्त आहात.' दरम्यान कपिलसोबत नेमकं काय घडलं ज्यामुळे तो व्हिलचेअरवर बसून एअरपोर्टवरून बाहेर पडला याचं कारण अद्याप समजलेलं नाही. पण कपिलचं अशाप्रकारचं वागणं पहिल्यांदाच पाहायला मिळालं आहे. अन्यथा इतर वेळी कपिल जेव्हाही पॅपराजींना भेटतो तेव्हा तो त्यांच्यासोबत खूप चांगल्या पद्धतीनं बोलताना दिसतो. कपिल शर्माचे व्हिलचेअरवर बसलेले एअरपोर्टवरील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या फोटोमध्ये कपिल व्हिलचेअर बसलेला असून एक पीपीई किट घातलेली व्यक्ती त्याला बाहेर घेऊन जात आहे. दरम्यान कपिलला काय झालं आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही किंवा कपिल स्वतः सुद्धा याबाबत कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. कपिल शर्माला अशाप्रकारे व्हिलचेअरवर बसून येताना पाहिल्यावर त्याचे चाहतेही हैराण झाले आहेत.


source https://maharashtratimes.com/entertainment/comedian-kapila-sharma-get-angry-on-photographers-while-they-asking-about-health/articleshow/81166299.cms

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785