शिवशक्ती तर्फे रस्ते सुरक्षा जनजागृती उपक्रमांचे आयोजन - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Tuesday, February 2, 2021

शिवशक्ती तर्फे रस्ते सुरक्षा जनजागृती उपक्रमांचे आयोजन

 

Road safety

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि शिवशक्ती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने " रस्ते सुरक्षा मास " दि. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी पर्यंत साजरा केला जात आहे. शिवशक्ती तर्फे रस्ते सुरक्षा जनजागृती करणेसाठी कडेगांव तालुक्यातील शाळांमध्ये रस्ते सुरक्षा व नियम आणि अटी पाळण्यासाठी शपथ कार्यक्रम, चित्रकला, निबंधलेखन व वक्तृत्व स्पर्धा आयोजन, वाहतुकीचे नियम दर्शवणारी दिनदर्शिका वितरण, रस्ते सुरक्षा संदेश असणारे मास्क वितरण, पाम्प्लेट वाटप, पथनाट्य व सोशल मीडियाद्वारे जनजागृती उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. सदर उपक्रमांमध्ये सहभाग घेणाऱ्या विदयार्थी व नागरिकांना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत सहभाग प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना हेल्मेट व आकर्षक बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती शिवशक्तीचे अध्यक्ष प्रमोद मांडवे यांनी दिली. रस्ते सुरक्षा मास व रस्ते सुरक्षा जनजागृती उपक्रमामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी 9673371785 या नंबरला संपर्क करण्याचे आवाहन शिवशक्ती तर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785