आवारा वेगाला सावरा जीवाला रस्ते सुरक्षाविषयक पथनाट्यातून जनजागृती - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Friday, February 5, 2021

आवारा वेगाला सावरा जीवाला रस्ते सुरक्षाविषयक पथनाट्यातून जनजागृती

आवारा वेगाला सावरा जीवाला रस्ते सुरक्षा जनजागृती पथनाट्य सादर करताना कलाकार.


               
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय व शिवशक्ती सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा मास दि. १८ जानेवारी ते दि. १७ फेब्रुवारी पर्यंत साजरा केला जात आहे. रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी निबंधलेखन
, चित्रकला स्पर्धा यासारखे कार्यक्रम संपूर्ण सांगली जिल्ह्यात आयोजित केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे आवारा वेगाला सावरा जीवाला रस्ते सुरक्षाविषयक पथनाट्य गावागावात आयोजित केले जात आहे. कडेगांव, कडेपूर व विटा बसस्थानकावर मी फिनिक्स टीमच्या कलाकारांनी सदर पथनाट्य प्रदर्शित केले. यामध्ये मी फिनिक्सचे कलाकार पंकज यादव, स्वप्नील घुटूकडे, ओंकार भोसले, वैभव भोईटे, सोहम बाबर, पावन भिसे, अंकिता भारंबल, सानिका सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

विटा बसस्थानक येथे रस्ते सुरक्षा जनजागृती 

              रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी शिवशक्तीच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांच्या सहकार्याने महिनाभर जनजागृतीपर कार्यक्रम विविध शाळा व कॉलेजमध्ये आयोजन केले जाणार आहे. आवारा वेगाला सावरा जीवाला हे पथनाट्य सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या गांवामध्ये आयोजन केले जात आहे. सदर उपक्रमासाठी शिवशक्तीचे अध्यक्ष प्रमोद मांडवे व मी फिनिक्सचे नितीन गवळी यांनी मार्गदर्शन केले. शिवशक्तीचे संपतराव मोरे, गणेश मांडवे, वैभव हणमर, साहिल पटेल व स्वयंसेवक विविध गावांत रस्ते सुरक्षा जनजागृती उपक्रम साजरे करीत आहेत. यासाठी नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 

कडेपूर येथे आवारा वेगाला सावरा जीवाला पथनाट्य सादर करताना कलाकार.

रस्ते सुरक्षा चळवळ गावागावात पोहचवणार : प्रमोद मांडवे

अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अपघात रोखण्यासाठी प्रभावी जनजागृती करणे गरजेचे आहे. रस्ते नियम व कायदे सर्वसामान्य लोकांना समजावून सांगणे गरजेचे आहे. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय व शिवशक्ती सोशल फौंडेशन यांच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा चळवळ गावागावात पोहचवणार असल्याचे प्रमोद मांडवे यांनी सांगीतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785