मी बरोबर असल्याचे पुन्हा झाले सिद्ध; मराठी निर्माती आणि खासदार राऊतांच्या वादात कंगनाची उडी - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Wednesday, April 7, 2021

मी बरोबर असल्याचे पुन्हा झाले सिद्ध; मराठी निर्माती आणि खासदार राऊतांच्या वादात कंगनाची उडी

मुंबई: शिवसेनेचे खासदार हे आपला छळ करत असल्याचा आरोप चित्रपट निर्मात्या डॉ. यांनी सोशल मीडियावर केला आहे. डॉ.स्वप्ना यांनी या पोस्टमध्ये एक चिठ्ठी लिहिली आहे आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांना टॅग करत मदतीची मागणी केली आहे. आता याप्रकरणावर कंगनानेही तत्परतेने प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि यांच्यात खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत. काय आहे मूळ प्रकरण? डॉ. स्वप्ना पाटकर यांनी ३० एप्रिल रोजी ट्विटरद्वारे शिवसेनेचे यांच्यावर आरोप केले आहेत. पाटकर म्हणतात, ' संजय राऊत गेल्या आठ वर्षांपासून शिवसेना पक्षातील त्यांचे स्थान आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत मला धमक्या आणि शिवीगाळ करत आहेत. इतकेच नाही तर माझे कुटुंब, माझा मित्रपरिवार, नातेवाईक यांनाही ते त्रास देत आहेत. काही ना काही आरोप माझ्य़ावर ठेवत पोलिस स्टेशनला मला चौकशीसाठी बोलावले जात आहे. यामुळे मी खूपच त्रस्त झाले आहे... ' याबरोबरच पाटकर यांनी दोन पानांची पत्र लिहून पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक नेतेमंडळींना टॅग केले आहे. यावेळी केलेल्या ट्विटमध्ये स्वप्ना पाटकर यांनी कुणी आपल्याला मारून टाकण्याआधी न्याय मिळावा अशी मागणी या सर्वांकडे केली आहे. कंगनाची वादात उडी कंगना आणि शिवसेनेचे विशेषतः संजय राऊत यांचे किती सख्य आहे हे जगजाहीर आहे. कंगनानेही लगेचच स्वप्ना पाटकर यांचे ट्विट रिट्विट केले. इतकेच नाही तर त्यावर ती म्हणते, ' मी पुन्हा एकदा बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे. मी जेव्हा बोलले होते, तेव्हा संपूर्ण जग माझ्याविरोधात उभे ठाकले होते आणि मी कशी चुकीची आहे हे ओरडून सांगत होते. परंतु मी माझ्या भूमिकेपासून तसूभरही दूर झाले नाही. १०० टक्के विजय. कुणालाही कितीही गर्व असला तरी शेवटी विजय हा माझाच होते... हा हा हा... ' आता कंगनाने केलेल्या खोचक टिप्पणीवर शिवसेना विशेष करून संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कोण आहे स्वप्ना पाटकर? शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर 'बाळकडू' या मराठी सिनेमाची निर्मिती झाली होती. त्या सिनेमाची निर्मिती डॉ. स्वप्ना पाटकर यांनी केली होती. स्वप्ना या प्रोफेशनली सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांची द रॉयल मराठी एंटरटेनमेंट नावाची निर्मिती संस्था असून त्याच्या त्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. याशिवाय त्यांनी २०१३ मध्ये मराठीत पुस्तकही लिहिले आहे.


source https://maharashtratimes.com/entertainment/marathi-film-producer-swapna-patker-accuse-shiv-sena-leader-sanjay-raut/articleshow/81954058.cms

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785