१३ वर्षाच्या यशराजला आहे पृथ्वीची काळजी. यशराज ने बनवलेली शाडूची गणपतीची मूर्ती घ्या पर्यावरणाचा ऱ्हास टाळा. - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Sunday, August 29, 2021

१३ वर्षाच्या यशराजला आहे पृथ्वीची काळजी. यशराज ने बनवलेली शाडूची गणपतीची मूर्ती घ्या पर्यावरणाचा ऱ्हास टाळा.

शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्ती
चि. यशराज धनाजी पवार याने शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्ती.

एमआयडीसी शिवाजीनगर ता. कडेगांव येथे राहणारा १३ वर्षाचा यशराज धनाजी पवार शाडूची हुबेहूब गणेश मूर्ती बनवत आहे. गेल्या 2 वर्षांपासून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी शाडूच्या मातीची गणेश मूर्ती घ्यावी असे आवाहन चिमुकला यशराज करत आहे.  मोठ्या-थोरांना पृथ्वीची निसर्गाची काळजी नाही पण यशराजला आहे.  

यशराज ने शाडूच्या मातीपासून बनवलेली
श्री गणेशाची सुबक मूर्ती. 
प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती मुळे जलप्रदूषण होते आणि भारतात बहुतांशी रोग हे अशुद्ध पाणी पिल्याने होतात. त्यामुळे शाडूच्या मातीपासून बनवलेली गणेश मूर्ती घ्या आणि प्रदूषण टाळा हा संदेश यशराज देत आहे. मातीची मूर्ती बनवण्यापासून रंगकाम स्वतः हा १३ वर्षाचा यशराज करत आहे.२ वर्षापूर्वी वडिलांच्या मागे लागून त्याने विकत शाडूची माती आणली आणि गणेश मूर्ती बनवायला सुरवात केली. हुबेहूब जशी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असते तशी मूर्ती यशराज बनवत आहे. अनेक पर्यावरण प्रेमी व सामान्य नागरिक या  चिमुकल्या यशराजची कला बघून थक्क होत आहेत. यशराज कडून नागरिक मूर्ती खरेदी करत आहेत. १३ वर्षाच्या यशराज घरातील किराणा मालाचे साहित्य विकण्यापासून रस्त्यावर भाजीपाला विकेने आणि आता स्वतः गणेश मूर्ती बनवून त्या सोशल मीडियावरून विकणे काम स्वतः कोणाच्याही मदतीशिवाय करत आहे. त्याचे व्यवहार चातुर्य आणि कलाकारी पाहून त्याच्या आई वडिलांना त्याचे कौतुक वाटत आहे.प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पाणी प्रदूषित होते. गणपती बाप्पाची मातीची मूर्ती प्रतिष्ठित करा आणि आपली पृथ्वी वाचवा.                                                                                             -यशराज धनाजी पवार                                       

आपणही यशराजच्या पर्यावरण वाचविण्याच्या लढ्यात सहभागी होऊया. शाडूच्या मातीची गणेश मूर्ती घेऊया. पर्यावरणाचा ऱ्हास टाळूया. 

चि. यशराज धनाजी पवार याच्याकडून गणेश शाडूच्या मातीची गणेश मूर्ती घेण्यासाठी  ७०२८९५५४२८ या नंबरला संपर्क करा. 


हे ही वाचा...

तडीपार Memories

वडील ढसाढसा रडले आणि कित्तेक वर्षांनी माझ्या डोळ्यात पाणी दाटले.

         सविस्तर वाचण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा. No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785