वृद्धांना लुटणारा भामटा : एटीएम कार्डची अदलाबदली करून लाखो रुपये लंपास - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Monday, September 13, 2021

वृद्धांना लुटणारा भामटा : एटीएम कार्डची अदलाबदली करून लाखो रुपये लंपास

: शहरातील एटीएम सेंटरबाहेर थांबून वयोवृद्ध नागरिकांचे एटीएम हातचलाखीने बदलून त्यांच्या खात्यातील पैसे लंपास करणाऱ्या भामट्यास पोलिसांनी सोमवारी अटक केली. अमोल दिलीप सकटे (वय २९, रा. सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असं अटकेतील तरुणाचं नाव आहे. त्याच्याकडून विविध बँकांचे पाच एटीएम, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन सप्टेंबर रोजी शिवपुत्र सोलापुरे हे वसंतदादा कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर असलेल्या एटीएम सेंटरमधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी पैसे निघाले नसल्याने ते जवळच असलेल्या दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये खात्यावरील बॅलन्स चेक करण्यासाठी गेले. तेव्हा तिथं उभ्या असलेल्या तरुणाला त्यांनी एटीएम कार्ड दिलं व पासवर्ड टाकून बॅलेन्स चेक करण्यास सांगितलं. त्यावेळी सदर तरुणाने एटीएमचा पासवर्ड पाहिला. त्यानंतर सोलापुरे यांना एटीएम परत करताना हातचालाखीने एटीएम कार्डची अदलाबदली केली. काही वेळातच सोलापुरे यांच्या अकॉऊन्टमधून १ लाख ३१ हजार ५१८ रुपये काढून घेतले. पैसे न काढताच डेबिटचा मेसेज आल्याने सोलापुरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक चौकशी करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण औताडे, संदीप नलवडे यांना संशयिताची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अमोल सकटे या संशयित तरुणास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्या खिशात विविध बँकाची ५ डेबिट कार्ड्स, त्यावरील बँक, नंबर व नावे, एसबीआयचे २ कार्ड, बँक ऑफ महाराष्ट्रचे १ कार्ड आणि एस बँकेची २ कार्ड मिळाले. याबाबत अधिक चौकशी केली असता, त्याने सर्व एटीएम कार्ड एटीएम सेंटरमधून वृद्धांची फसवणूक करून घेतल्याचं सांगितलं. दरम्यान, वृद्धांची फसवणूक करून चोरलेल्या एटीएम कार्डवरून अमोल सकटे याने लाखो रुपये लंपास केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YTsqnz

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785