धक्कादायक! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग लहान मुलाच्या हातात; पुढे काय घडलं? - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Tuesday, September 14, 2021

धक्कादायक! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग लहान मुलाच्या हातात; पुढे काय घडलं?

: गंगापूरहून उदगीरकडे जात असलेल्या धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग चालकाने लहान मुलाच्या हातात दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एसटी चालक आर.बी. शेवाळकर याला निलंबित करण्यात आलं आहे. ही घटना रविवारी (१२ सप्टेंबर) रोजी घडली असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. रविवारी गंगापूर आगारातील घेऊन आर. बी. शेवाळकर हे उदगीरकडे निघाले होते. बसमध्ये २५ पेक्षा अधिक प्रवासी होते. ही बस घेऊन जात असलेल्या शेवाळकर याने धावत्या बसचं स्टेअरिंग एका लहान मुलाच्या हातात दिलं. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त करत एसटी चालकाच्या निलंबनाची मागणी केली. त्यानंतर सोमवारी शेवाळकर हे उदगीरहून बस घेऊन गंगापूर येथे आले असता त्यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. याबाबत शेवाळकर यांनी एसटी प्रशासनाला दिलेल्या खुलाशामध्ये त्यांच्या बसमध्ये एका लहान मुलगा रडत होता. या लहान मुलाचं रडणं थांबवण्यासाठी त्याच्या हातात स्टेअरिंग दिलं, असा खुलासा त्याने दिल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, लहान मुलाच्या हातात स्टेअरिंग सोपवण्याच्या प्रकरणामुळे विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी शेवाळकर याला निलंबित केलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AfUNKn

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785